Monday, September 21, 2009

.....प्रेम करायचयं ... ???....

मित्र विचारतात की काय होतं प्रेम करायला ?
तुझं जातं तरी काय प्रेमात पडायला ?
अरे मी नाही कुठे म्हटलं प्रेमात पडायला ?
पण कोणीतरी हवं ना धक्का द्यायला !!!

बर्याचदा वाटत आपणही प्रेम करावं ,पण कोणी भेटायला तरी हवं ?
तस शोधल्या वर भेटतील ही ,पण काय Guaranty ते टिकतील ही ?
प्रेम कोणी शिकवत नसत ,ते Experience मधुनच शिकायचं असतं ...
एकदा करुन होत नसतं ,ते भरपूर वेळा कारावसं वाटतं ....

प्रेमाची म्हणतात गोष्टच वेगळी ...पण प्रेमाच्या सगळ्याच गोष्टी सारख्याच असतात ...
आधी भेटनं , मन जूळनं आणि मग दूर होणं ....
एवढ्या वरच "The End" होतात ...
तिच्या हसान्याला हसावे लागते ,ती रडताना अगदी दुखी चेहर्याने बसावे लागते...हो ला हो करावे लागते ...नाही ला अजिबात नाही असेच समजावे लागते ...
नेहमीच्या मित्राना भेटनं कमी होत ,घरातल्या घरात बोलणं कमी होत ,
Time ची value सुद्धा समजायला लागते ...
कारण भेटायला वेळेआधीच Present रहावे लागते...
प्रेमाला वेळ देऊन होत नाही ,प्रेमातून वेळ काढावी लागते ,
Mobile मधे Balance उरत नाही ,Battery देखिल संपायला लागते ...
चालते तोवर चालवावे लागते ,बंद पडले की थोड़े Tenssion वाढते ...
मग थोड़े रडून वगैरे जाले की ,पुन्हा नविन शोधावे लागते ....
आता प्रेम करायचेच म्हटल्यावर ...थोड़े तरी सहन करावे लागते ...आणि ते नाही केले तरी ,इतरांचे ऐकावे लागते ...

0 comments: